यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अमळनेर येथे उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमळनेर येथे उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन सोमवार, दिनांक ०५ऑगस्ट २०२४ रोजी अमळनेर-धरणगावरोड, अमळनेर, जळगाव येथे चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अनिल पाटील, मंत्री, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे होते, याप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सदस्य राजेश पांडे हे देखील मंचावर उपस्थित होते.

आपले विचार व्यक्त करतांना चंद्रकात दादा पाटील म्हणाले की, मुक्त विद्यापीठाने सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र सुरू करावे. उपकेंद्राची इमारत तयार होण्यास काही अवधी लागेल त्यापुर्वी तात्पुरत्या स्वरूपात अमळनेर येथे इतर ठिकाणी केंद्र सुरु करावे. आपल्याला जगातील किमान दहा भाषा येणे गरजेचे आहे, यासाठी मुक्त विद्यापीठांने काळाची गरज लक्षात घेऊन विदेशी भाषांचे शिक्षणक्रम सुरू करावे. यामुळे आपल्या तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगीतले. अशाच प्रकारचे उपकेंद्र मुक्त विद्यापीठ राज्यात इतर ठिकाणी देखील सुरू करणार आहे, त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती करण्यास शासन सदैव विद्यापीठासोबत राहील असेही त्यांनी सांगीतले.

Advertisement

याप्रसंगी अनिल पाटील, कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राजेश पांडे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी केले, तर आभार कुलसचिव दिलीप भरड यांनी मानले. कार्यक्रमास मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ संजीवनी महाले, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, विभागीय संचालक डॉ प्रमोद रसाळ, कार्यकारी अभियंता राजेश भावसार, किरण हीरे, कैलास मोरे, डॉ मधुकर शेवाळे, सुनिल निकम तसेच अमळनेर येथील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

सदर उपकेंद्रामुळे खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील वंचित दुर्लक्षित घटकांना कला शाखा, कॉमर्स, विज्ञान व २५० च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम, तसेच कौशल्य विकास शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ या विद्यार्थ्यांना होणार आहे.

विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांनुसार उच्च शिक्षण त्याबरोबरच जीवनात उपयोगी ठरणारे प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्स, कृषी विषयक तंत्रज्ञानाची माहिती व कौशल्यावर आधारित शिक्षण दूरस्थ शिक्षणाबरोबरच ऑनलाईन शिक्षणतसेचसंशोधन व स्टार्ट अप प्रोत्साहन व गुणात्मक, संख्यात्मक वाढ शाश्वत विकासासाठी विद्यापीठाला सध्याच्या नाशिक येथील मुख्यालयासोबत इतर ठिकाणी विद्यापीठ विस्तार करणे आवश्यक आहे, त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर येथे उपकेंद्र सुरू करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page