अमरावती विद्यापीठात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page