अमरावती विद्यापीठात जागतिक योग दिन उत्साहात साजरा
शरीर स्वास्थ्यासाठी योगा उत्तम – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : शरीर स्वास्थ्यासाठी योगा हा उत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एम ए योगशास्त्र व पी जी डिप्लोमा इन योग थेरपी यांच्यावतीने 21 जून, 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ वैशाली गुडधे, स्वामी विवेकानंद वाचनालय व संसाधन केंद्र, मानव रचना विद्यापीठ फरिदाबाद, हरियाणा येथील डॉ. ममता कौशिक, अमरावती शहरातील स्वास्थ्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, योग तज्ज्ञ व वैद्यकीय व्याख्याता डॉ संगिता सौंदळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कुलगुरू म्हणाले, भारतात प्राचीन काळापासून योगा सुरू आहे. योगा हा आपल्या ऋषिमुनींनी दिलेला वारसा असून आपण तो जपला पाहिजे. या आंतरराष्ट्रीय दिनाच्या अनुषंगाने सर्वांनी नियमित पाच मिनिटे तरी योग करण्याचा संकल्प करावा व नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करुन त्याला योगाची जोड दिल्यास कोणत्याही आजाराचे संक्रमण होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ गीताने झाली. प्रा स्वप्निल ईखार यांच्या शंखनादाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. यावेळी त्यांनी आयुष मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे उपस्थितांकडून योगाभ्यास करुन घेतला. तसेच डॉ संगिता सौंदळे यांनी ध्यान साधना करून घेतली, तर डॉ ममता कौशिक यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांनी विभागामध्ये सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण व रोजगारभिमुखकतेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांचा डॉ श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ अनघा देशमुख, तर आभार प्रा स्वप्निल मोरे यांनी मानले. योगासनाचे प्रात्यक्षिक प्रा शिल्पा देवारे व प्रा राधिका खडके यांनी करून दाखविले. यशस्वी आयोजनाकरीता प्रा शुभांगी रवाळे, प्रा प्रफुल्ल गांजरे, प्रा अश्विनी राऊन, डॉ रणजीत बसवनाथे, वृशाली कडू यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, अध्ययन व विस्तार विभागातील विविध अभ्यासक्रमांचे प्रा वैभव जिसकार, प्रा राम ओलीवकर, प्रा झुबेर खान, प्रा निकीता वाघमारे, प्रा अलका ब्रााम्हणकर, प्रा माधुरी पुनसे, प्राध्यापक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.