डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह उत्साहात साजरा

जयसिंगपूर , कोल्हापूर : डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (कोल्हापूर लोकल ब्रांच) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन (२५ सप्टेंबर) तसेच राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह (१७ ते २३ सप्टेंबर) उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांचा उद्देश जागतिक आरोग्यसेवेत फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका, औषधांचा सुरक्षित वापर आणि जनजागृती याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

World Pharmacist Day and National Pharmacovigilance Week celebrated with enthusiasm at Dr. J. J. Magdum Pharmacy College, Jaysingpur

कार्यक्रमाची सुरुवात सुमारे ५०० विद्यार्थी व नोंदणीकृत फार्मासिस्ट यांच्या सहभागाने काढलेल्या फार्मासिस्ट रॅलीने झाली. फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उदगाव येथे प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. तसेच महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील मॉडेल मेकिंग, ओरल प्रेझेंटेशन, टेड टॉक, अॅड मॅड शो, रील मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यात अनेक फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश नायर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी भूषविले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी जागतिक स्तरावर भारताच्या फार्मसी क्षेत्रातील योगदानाची माहिती देत फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. विजेत्यांना बक्षीस रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

World Pharmacist Day and National Pharmacovigilance Week celebrated with enthusiasm at Dr. J. J. Magdum Pharmacy College, Jaysingpur

या कार्यक्रमासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व वाईस चेअरपर्सन ऍड. डॉ. सोनाली मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्नेहल पाटील आणि प्रा. अनुजा खिचडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com