ज. ने. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक दर्जाची कोलोप्रॉक्टोलॉजी कार्यशाळा

वर्धा, सावंगी (प्रतिनिधी) – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात (ज. ने. वै. म.) कोलोप्रॉक्टोलॉजी (गुदद्वार व मलाशय संबंधित शस्त्रक्रिया) विषयावर जागतिक दर्जाची एकदिवसीय निरंतर वैद्यकीय शिक्षण (CME) कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शल्यचिकित्सकांनी आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभाला अधिष्ठाता डॉ. सोनाली चौधरी, रुग्णालय समूह संचालक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय मुडे आणि विभाग प्रमुख डॉ. आर.के. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

World-class Coloproctology Workshop at Jawaharlal Nehru Medical College and Hospital, Sawangi, Wardha
World-class Coloproctology Workshop at Jawaharlal Nehru Medical College and Hospital, Sawangi, Wardha

कार्यशाळेत इंग्लंडमधील वेस्ट सफोक हॉस्पिटल एनएचएसचे डॉ. अक्षय बविकट्टे, एम्स मंगलगिरी (आंध्रप्रदेश) येथील डॉ. मीनाक्षी येवला, तसेच डॉ. प्रशांत रहाटे, डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर आणि डॉ. अक्षय आकुलवार यांनी लेझर शस्त्रक्रिया व रेडिओफ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक पद्धतींची सविस्तर माहिती दिली. मूळव्याध, भगंदर, गुदभ्रंश आणि मलाशयातील कर्करोग यांसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांवर आधुनिक तंत्रज्ञानासह व्हिडिओ प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

सुमारे १२५ प्रतिनिधींनी सहभाग नोंदवलेल्या या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहअध्यक्ष डॉ. पूजा बत्रा, आयोजन सचिव डॉ. स्वाती देशपांडे, सहसचिव डॉ. संजीव ग्यानचंदानी यांच्यासह ॲनेस्थेशियालॉजी विभाग प्रमुख डॉ. विवेक चकोले, डॉ. नीता वर्मा, डॉ. शीतल मडावी, मृणाल बमबोडे, अजित कानोडे, मुरलीधर सातपुते आणि संपूर्ण ॲनेस्थेशियालॉजी व शल्यचिकित्सा टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

World-class Coloproctology Workshop at Jawaharlal Nehru Medical College and Hospital, Sawangi, Wardha
जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, सावंगी ,वर्धा येथे जागतिक दर्जाची कोलोप्रॉक्टोलॉजी कार्यशाळा

ही कार्यशाळा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याचे आणि परस्पर संवाद साधण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com