उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा प्रशाळा व संशोधन केंद्रात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाषा अभ्यास प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. डॉ सुदर्शन भवरे यांनी आदिवासी दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना आदिवासी दिवसाचे महत्व व इतिहास सांगितला. जेणे करुन ते जगाच्या मुख्य प्रवाहात येतील.

Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon
KBCNMU

राहुल पावरा या विद्यार्थ्यांने आदिवासी कविता सादर केली. सरगम तडवी या विद्यार्थीनीने आम्ही आदिवासी या देशाचे मुल निवासी ही कवीता सादर केली. एम ए इंग्रजी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासीचे सांस्कृतीक दर्शन एका नृत्याच्या आधारे घडविले.

Advertisement

भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालक प्रा.मुक्ता महाजन यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की आदिवासी हे या देशाचे खरे भुमीपुत्र आहे. ते जंगलाचे रक्षण करतात. त्यांनी ही संस्कृती टिकवून ठेवली. त्यांना सर्व प्रकारचे मुलभुत ज्ञान आहे. निसर्गाने दिलेले ज्ञान त्यांच्याकडे आहे. शिक्षण हे मुलभुत पाया आहे. शिक्षणचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे जेणेकरुन आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येईल.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा कृष्णा संदानशिव यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ दीपक खरात यांनी मानले. प्रा डॉ प्रिती सोनी, प्रा प्रतिमा गलवाडे, प्रा भारती सोनवणे, प्रा नेत्रा उपाध्ये व शिक्षकेतर कर्मचारी भरत पालोदकर, चंद्रकांत बिऱ्हाडे, हेमेंत पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page