एमजीएमच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चमध्ये कार्यशाळेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन गुरूवार, दिनांक २० जुलै २०२३ ते २२ जुलै २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यशाळेची थिम इफेक्टिव्ह अॅनालिसीस फॉर रिसर्च एक्सेलन्स ही आहे.नवीन शैक्षणिक धोरणामुळे संशोधनाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक प्राध्यापकाने शिकविण्यासोबतच संशोधनावरही भर देणे ही काळाची गरज झालेली आहे. म्हणूनच संशोधनातील महत्वाचा समजला जाणारा हिस्सा डेटा अॅनालिसिससाठी एस.पी.एस.एस मधील प्रात्यक्षिक अनुभवासाठी ही कार्यशाळा नियोजित आहे. या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून डॉ. ललित प्रसाद आणि प्रियंका मिश्रा मागदर्शन करणार आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चच्या संचालिका डॉ.विजया देशमुख यांनी रिसर्च स्कॉलर, अॅकॅडमिशयन आणि औद्योगिक क्षेत्रातील इच्छुक व्यक्तींना या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी तसेच कार्यशाळा नोंदणीसाठी https://forms.gle/mniBgJRKKflT4Tv67 या वेबसाईटला व्हिजीट करावी. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. सुभाष पवार आणि प्रा. सुचित्रा मेंडके हे काम पाहत आहेत.