मिल्लिया महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यशाळा
प्रत्येक कार्यालयीन पत्रव्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा- डॉ.सय्यद हनीफ
बीड : मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांसाठी “कार्यालयीन पत्रव्यवहारात मराठी भाषेचा वापर” या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, कार्यक्रमाचे संयोजक नॅक समन्वयक डॉ. अब्दुल अनीस, प्रोफेसर शैलेंद्रसिंह ठाकुर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अब्दुल अनीस यांनी केले. त्यांनी मराठी भाषा व साहित्याचा विकास याबद्दल माहिती दिली. मराठी समृद्ध भाषा असल्यामुळे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे व आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे असे सांगितले. उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ यांनी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कार्यालयीन पत्रव्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा तसेच भाषा व्यक्तीमध्ये योग्य संस्कार निर्माण करते. केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे तर आचार-विचारातून मराठी भाषा दिसायला हवी व तिचे संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यायला हवी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अब्दुल अनीस यांनी तर आभार वरिष्ठ लिपिक शेख समीउद्दिन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.