सोलापूर विद्यापीठात शनिवारी सेट-नेट परीक्षेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विशेष कक्ष विभागाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सेट-नेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. 30 मार्च 2024 रोजी मोफत सेट-नेट पेपर क्रमांक एक या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 11 वाजता कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता प्रा शशिकांत शिंदे, दूर शिक्षण विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील डॉ कृष्णा पाटील आणि सेवानिवृत्त अधिव्याख्याता डॉ हनुमंत जगताप हे मार्गदर्शन करणार आहेत. सेट-नेटच्या पेपर क्रमांक एक विषयावर या कार्यशाळेत तज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन मिळणार आहे. सकाळी 11 ते 5 यावेळेत सदरील कार्यशाळा असून शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना यासाठी https://forms.gle/f38gWLtP5sZkxi5Q9 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.