‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे व सेवाभावी संस्थाची भूमिका’ विषयावर कार्यशाळा ६ सप्टेंबर रोजी
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राच्यावतीने ‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे व सेवाभावी संस्थाची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवार दि ६ सप्टेंबर, 2024 रोजी डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी 10:00 ते 10:45 या वेळात सेवाभावी संस्था सदस्यांनी नोंदणी होणार असून सकाळी 11:00 ते 01:00 या कालावधीमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार असून उद्घाटक म्हणून संत गाडगे बाबा मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्ही एम उपाख्य भैय्याहेब मेटकर, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तथा समाजशास्त्रज्ञ डॉ अंबादास मोहिते व विदर्भ महारोगी सेवा मंडळ (तपोवन), अमरावतीचे अध्यक्ष डॉ सुभाष गवई उपस्थित राहणार आहेत.
दुपारचे सत्र दुपारी 01:45 ते 02:30 या वेळात ‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे व सेवाभावी संस्थाची भूमिका’ या विषयावर आयोजित केले असून मार्गदर्शक म्हणून संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र प्रमुख डॉ दिलीप काळे व इन्नानी महाविद्यालय, कारंजा लाडचे माजी प्राचार्य डॉ पृथ्वीसिंह राजपूत उपस्थित राहतील. दुपारी 02:30 ते 03:30 या कालावधीमध्ये संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीवर केलेल्या कामाच्या कार्याचे सेवाभावी संस्थाद्वारा सादरीकरण होईल. दुपारी 03:30 ते 04:00 या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचा कृती आराखडा, तर दुपारी 04:00 ते 05:00 कार्यशाळेचा समारोप होईल. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद राज्यपाल नामित सदस्य डॉ रविंद्र कडू यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोपीय कार्यक्रम होणार असून प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे उपस्थित राहतील.
तरी या कार्यशाळेला जास्तीतजास्त सेवाभावी संस्थेच्या पदाधिकायांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र प्रमुख डॉ दिलीप काळे यांनी केले आहे.