देवगिरी महाविद्यालयात “संशोधन पद्धती : साधने आणि तंत्रे” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय समाजशास्त्र विभागाद्वारा एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन प्रो सुरेंद्र ठाकूर, सहसंचालक, उच्चशिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे असणार आहेत.
कार्यशाळेचे पहिले सत्र ‘संशोधनात्मक पेपर कसा लिहावा‘ या विषयावर प्रो सुरेंद्र ठाकूर हे मार्गदर्शन करणार असून, दुसऱ्या सत्रात ‘संशोधन विषयाची मांडणी’ या संदर्भात प्राचार्य प्रो अशोक तेजनकर तर, तिसऱ्या सत्रात प्रो दिलीप खैरनार हे ‘संशोधनाच्या उद्दिष्टाची मांडणी,संकल्पनीकरण,साशोधन साहित्याचा आढावा,व नमुना निवडीवर’ भाष्य करणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘गृहितकाची पडताळणी’ यावर. प्रो आर. ई. मार्टिन मार्गदर्शनकरणारअसून,’संख्यात्मक मापनावर’ ईफॉरमॅटिक पब्लीशींग हाउसचे, मॅनेजर, निहाल माळी हे मार्गदर्शन करतील तर, एस.पी.एस.एस.चे साउथ एशिया विभागाचे सांखिकी तज्ञ राहुल बिंगी यांचे मार्गदर्शन होणार आहे. सदर कार्यशाळेसाठी संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी कार्य शाळेस उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य. प्रो अशोक तेजनकर, कार्यशाळेचे संयोजक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो दिलीप खैरनार, डॉ .अनिल अर्दड, डॉ. अपर्णा तावरे, डॉ. पी. टी. बाचेवाड, प्रा, तन्मय भावसार यांनी केले आहे.