विवेकानंद महाविद्यालयात संशोधन पद्धतीवरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद महाविद्यालयात दि.09/02/2024 रोजी संशोधन पद्धतीवरील कार्यशाळेचे उदघाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. पदमाकर शहारे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो दादाराव शेंगुळे, तर सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्रो संदीप चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी ते बोलताना डॉ. शहारे म्हणाले की, संशोधनातून सामाजिक प्रश्न सुटले पाहिजेत, जेणेकरून समाजातील जीवन सुरळीत पार पाडले जाईल. यासाठी संशोधकानी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रो आप्पाराव वागडव यांनी केले, तर सूत्र संचालन प्रा. प्रकाश इंगळे व आभार डॉ. गोपाळ गांगर्डे यांनी केले. या कार्यशाळेस संशोधक विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.