शिवाजी विद्यापीठात पीएम-उषा अंतर्गत ‘ऑनलाईन अभ्यासक्रमाचे अध्यापनशास्त्र’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

शैक्षणिक परिसंस्था विकसित करण्यासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता – डॉ. चेतना प्र. सोनकांबळे


कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम-उषा) ‘ऑनलाईन अभ्यासक्रमाचे अध्यापनशास्त्र’ या विषयावर दि. १६ व १७ जानेवारी रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे यांनी शैक्षणिक परिसंस्था विकसित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा प्रभावी वापर अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या शैक्षणिक वातावरणात पारंपरिक अध्यापनासोबतच डिजिटल व ऑनलाईन साधनांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

A two-day workshop on the pedagogy of online courses under PM-Usha was organized at Shivaji University, Kolhapur.

कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची उद्दिष्टे व रूपरेषा स्पष्ट केली. या कार्यशाळेमध्ये पारंपरिक तसेच ऑनलाईन वर्गव्यवस्थापनासाठी आवश्यक सैद्धांतिक पार्श्वभूमी आणि प्रात्यक्षिकांवर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

A two-day workshop on the pedagogy of online courses under PM-Usha was organized at Shivaji University, Kolhapur.

कार्यशाळेत पुढील तज्ञ वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत –

  • डॉ. अर्पिता कथाने, सिम्बॉयसिस कॉलेज, पुणे
  • डॉ. पंकज कथाने, संस्थापक व संचालक, आयडिलायसर कंटेन्ट सोल्युशन प्रा. लि., पुणे
  • डॉ. सुरेश माने, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कोल्हापूर
  • डॉ. राहुल शहा, तुळजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, बारामती

कार्यशाळेचे सहसमन्वयक म्हणून श्रद्धा तांडेल व डॉ. अंजली गायकवाड यांनी काम पाहिले, तर सूत्रसंचालन बी.एड., एम.एड. (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी पूजा लोंढे यांनी केले.

या प्रसंगी डॉ. विद्यानंद खंडागळे, अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी तसेच एम.एड., बी.एड., एम.एड. (एकात्मिक) व बी.एस्सी. बी.एड. (ITEP) चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com