देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात चार दिवसीय पीसीबी डिझाइनवर कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे परिपुर्ण ज्ञान संपादन करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयईटीई विद्यार्थी मंच यांनी पीसीबी डिझाइन कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने आणि इलेक्टॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या विभागप्रमुख डॉ आरती वाढेकर यांनी केले. यावेळी डॉ राजेश औटी व प्राध्यापकांची उपस्थिती होती.
पीसीबी कार्यशाळा एक प्रशिक्षण सत्र आहे जे सहभागींना प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) आणि त्यांची डिझाइन, असेंब्ली, चाचणी आणि उत्पादनाबद्दल शिकवते. पीसीबी कार्यशाळा अनेक विषयांवर लक्ष केंद्रीत करु शकतात, ज्यात सामविष्ट आहे. पीसीबी डिझाइन सॉफ्टवअर स्थापित करणे, लेआऊट आणि साधनांची समज स्कीमॅटीक संपादकाच्या मूलभूत गोष्टी प्रकल्प संकलित करणे आणि तयार करणे. या कार्यशाळेत पीसीबी तयार करण्याची प्रक्रिया प्रा कृष्णा इंगळे, प्रा सुनंदा कापडे, प्रा सचिन जगदाळे, रुतीका धुशींग, श्र्वेता जगताप यांनी मांडली.
कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष लहाने, ट्रेनिंग ॲण्ड प्लेंसमेंटचे डिन प्रा संजय कल्याणकर, विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ सचिन बोरसे, डॉ सुगंधा नांदेडकर, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, प्रा अमरसिंह माळी, अच्युत भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयईटीई विद्यार्थी मंचच्या संयोजक प्रा कोमल दांडगे यांनी मार्गदर्शन केले व अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी आणि संपुर्ण टीमने परीश्रम घेतले.