डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ‘गट-ब्रेन-ऍक्सिस’ विषयावर कार्यशाळा संपन्न
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील शरिरक्रियाशास्त्र विभागाकडून ‘गट-ब्रेन-ऍक्सिस’ विषयावर कार्यशाळा प्रसिध्द गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ अमित कविमंडन तसेच अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख, एमएमसी निरीक्षक डॉ पद्माकर सोमवंशी, विभाग प्रमुख डॉ सुषमा पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी गायटॉन हॉल येथे आयोजित केली होती.

या कार्यशाळेला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडून क्रेडिट पॉईन्ट मंजूर करण्यात आला होता. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ अमित कविमंडन यांनी आतड्यांच्या आरोग्याचे महत्व आणि त्याचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी पॉवर पाईन्टच्या माध्यमातून उपस्थितांना प्रबोधन केले. तसेच निरोगी समाज बनण्यासाठी प्रत्येकाला आपल्या सांस्कृतिक आहार सवयींकडे परत येण्यासाठी प्रोत्साहीत केले. अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांनी ‘गट-ब्रेन-ऍक्सिस’ विषयावर कार्यशाळा आयोजीत केल्याबद्यल फीजिओलॉजि विभागाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुरूवातीला मान्यवरांचे हस्ते शिक्षणमहर्षीं डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन करून कार्यशाळेला सुरूवात झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता डॉ एस एम वावगे, डॉ एस एन निवाणे, डॉ व्ही आर पराते, डॉ एस एस व्यास, डॉ एन ए भुईभार तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रियल तोलानी यांनी केले तर आभार डॉ सुषमा पांडे यांनी मानले.