शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण केंद्राच्या परीक्षा अर्जाबाबतची कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षणच्या बी. ए., बी. कॉम., एम. ए. (मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास), एम. कॉम., या अभ्यासक्रमाच्या मार्च/एप्रिल २०२४ च्या रिपीटर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणेबाबतची कार्यवाही सुरु आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रांच्या समन्वयक व लेखनिक यांची परीक्षा फॉर्म भरणेच्या प्रक्रियेबाबत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डॉ. डी. के. मोरे होते.
परीक्षा अर्ज भरणे व त्या अनुषंगाने येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निरसन करण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत परीक्षा अर्ज भरणेबाबतचे प्रात्यक्षिक सादरीकरण संगणक चालक विकास मोहिते केले. तसेच एम. ए. / एम. कॉम भाग १ व २, बी. ए., बी. कॉम भाग १, २ व ३ मधील जे विद्यार्थी सेमिस्टर १, ३ व ५ मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी सेमिस्टर २, ४ व ६ चा परीक्षा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. तसेच जे विद्यार्थी सेमिस्टर १, ३, व ५ मध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांना अनुत्तीर्ण परीक्षा फॉर्मव संबधित अनुत्तीर्ण विषयाची परीक्षा फी भरावी लागणार आहे. तरी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख ०७ फेब्रुवारी २०२४ असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेत भरावेत. असे आवाहन समन्वयक डॉ. के. बी. पाटील यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापी रिपीटरचा फॉर्म भरलेले नाही त्यांनी https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/login या लिंक जावून भरावा. असे आवाहन प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी केले आहे. यावेळी प्रास्ताविक समन्वयक डॉ. सुर्यकांत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सहा. प्राध्यापक डी. के. कमलाकर यांनी केले. तर आभार समन्वयक डॉ. सी. ए. बंडगर यांनी मानले.