गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी संस्कृती व इतिहास दस्तऐवजीकरण आणि जतन’ यावर कार्यशाळा संपन्न

गडचिरोली : आदिवासी भाषा, इतिहास, कला, हस्तकला, पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करने व आदिवासी समस्या, जीवन, इतिहास आणि संस्कृतीच्या विविध उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणुन शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता आदिवासी अध्यासन केंद्र रिसर्च फेलोशिप आदिवासी संस्कृती आणि इतिहासाचे दस्तऐवजीकरण आणि जतन’ सुरुवात केली आहे. रिसर्च फेलोशिप अंतर्गत आदिवासी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये सैद्धांतिक, वैचारिक आणि धोरणात्मक परिणाम असलेले नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी ०६ संशोधक विध्यार्थ्याना एक वर्ष कालावधी करीता रिसर्च फेलोशिप देण्यात आलेली असुन या अंतर्गत आदिवासी संस्कृती व इतिहास यांचे दस्तऐवजीकरण करणे हे कार्य गोंडवाना विद्यापीठ द्वारे पार पाडणार आहे.

या अंतर्गत वाघुजी पोचीराम गेडाम, श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा व राम दिलीप चौधरी, आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क, चिमुर यांची चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती, राजुरा,गोंडपिपरी तालुक्यातील कोलाम व गोंड आदिवासी जमाती व सोनाली सगन मडावी, मनीषा संतलाल हिलको, पी जी टी डी इंग्रजी, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, नीलकंठ दलसाय होळी, श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा, रिषभ भीमराव दुर्गे, पी जी टी डी इतिहास, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांची गडचिरोली जिल्हातील कोरची, कुरखेडा, धानोरा व एटापल्ली तालुक्यातील कवर, गोंड, माडिया आदिवासी जमातीची संस्कृती आणि इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्याकरिता आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने तज्ञ मार्गदर्शक सह निवड करण्यात आली व संशोधन कार्यपद्धती संदर्भात दि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी “आदिवासी संस्कृती आणि इतिहासाचे दस्तऐवजीकरण आणि जतन” या विषयावर संशोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते.  

Advertisement

संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ धनराज पाटील विभाग प्रमुख पी जी टी डी समाजशास्त्र यांनी, संशोधनाच्या मुख्य पद्धती व त्यांचा आदिवासी जमाती वर संशोधन करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरतील व त्यातून खरे संशोधन साध्य करता येईल. संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन एकंदरीत डॉक्युमेंटरी व दस्तऐवजीकरण आधारित असल्याने प्रश्नावली, मुलाखत पद्धती, समूह चर्चा, निरीक्षण वर लक्ष केंद्रित करणे अशा अनेक संशोधन पद्धतीचा वापर संशोधक करू शकतात अशा संदर्भातील माहिती यावेळी डॉ धनराज पाटील यांनी दिली.

डॉ रुपेंद्रकुमार गौर, फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली यांनी मार्गदर्शन करतानी आदिवासी भागा मध्ये आदिवासीं संस्कृती व इतिहास संदर्भातील माहिती संकलन व तथ्याचे प्रमाणीकरण करणे संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते याबद्दल सखोल माहिती दिली, व डॉ कुंदन दुपारे यांनी, संशोधकांनी नेमलेल्या संशोधनाच्या क्षेत्र मर्यादा व त्याची पार्श्वभूमी तयार करताना मासिक, लेख, व्हिडिओज यांचा अभ्यास संदर्भ साहित्यात करणे. तेव्हाच निश्चित कालखंड घेतल्यानंतर बदल आणि परिवर्तन संशोधकांना कळेल. अशी विस्तृत माहिती यावेळी दिली.

डॉ नरेश मडावी यांनी संशोधन करिता आदिवासी गावाची निवड करतानी शहरी भागापासून दूरचे गाव निवडावे व संशोधन कार्य ग्रामसभेची अनुमती व दस्तऐवजीकरण करत असतानी येणाऱ्या समस्या संदर्भातील संशोधक प्रश्नाचे निराकरण मार्गदर्शन सत्रामध्ये केले.

कार्यशाळेचे आयोजन व सूत्रसंचालन डॉ वैभव मसराम, समन्वयक आदिवासी अध्यासन केंद्र व आभार प्रदर्शन प्रा अतुल गावस्कर, सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग यांनी केले व प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रवीण मोते नागपूर, आदिवासी अभ्यासक व कार्यशाळा करिता संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page