उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सायबर सुरक्षा या विषयावर कार्यशाळा संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेच्यावतीने सायबर जागरुकता दिनानिमित्त सायबर सुरक्षा या विषयावर बुधवार दि ७ ऑगस्ट रोजी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
प्रशाळेतील क्विक हिल सायबर वॉरीयर क्लब आणि क्विक हिल फौंडेशन यांच्यावतीने झालेल्या या कार्यशाळेत ॲङ श्रध्दा काबरा, ॲङ गायत्री विसपुते, ॲङ भक्ती उपासनी, प्रशाळेचे संचालक प्रा सतीश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या कार्यशाळेत ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सायबर स्वयंसेवक पायस सावळे, मयुर बांडे, प्रियंका मराठे, प्रणित मराठे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती दिली.
यावेळी समन्वयक प्रा राजू आमले, प्रा अजय सुरवाडे, प्रा राम भावसार, प्रा सुरेंद्र कापसे, प्रा मनीषा देशमुख आदी उपस्थित होते.