श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील “दंडकारण्य” ग्रीन क्लबची कार्यशाळा संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील “दंडकारण्य” ग्रीन क्लब ची कार्यशाळा संपन्न झाली. महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने (YEWS) नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या अभियानाची सुरुवात मागच्या वर्षापासून झालेली आहे, शैक्षणिक वर्ष 2024 -25 करिता या अभियानामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या युवकांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून या अभियानाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ अरुण दैतकार यांनी मार्गदर्शन केले. युवकांमध्ये वातावरण, हवामान बदल, आणि पाणीबचत याविषयी माहिती वृद्धिंगत करणे, तसेच कौशल्य विकसित करणे व मोबाईल मध्ये व्हाय वेस्ट{ Why West} नावाचे ॲप इंस्टॉल करून छोट्या छोट्या कृती करण्याचे कार्य देण्यात आलेले असते. यामध्ये सेविंग करताना नळबंद ठेवणे, ब्रश करताना पाण्याचा नळ बंद करणे कमीत कमी पाणी वापरणे पिण्यासाठी पाण्याचा ग्लास च्या ऐवजी तांब्या आणि फुलपात्र देऊन पाणी वापरा विषयी जागृती निर्माण करणे, आंघोळीसाठी शॉवरच्या ऐवजी बादलीने पाणी वापरणे अशा स्वरूपाच्या कृती आहेत. याचा परिणाम असा होतो की विद्यार्थ्यांमध्ये पाणी व नैसर्गिक संसाधन जतन करण्याची एक मानसिक तयारी होते. व सहज वर्तनपरिवर्तन होते आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी कोणत्या कृतीची आवश्यकता आहे याविषयी जाणीव जागृती करण्यात येते.
श्री बंकटस्वामी महाविद्यालयात ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ शंकर धांडे यांची निवड करण्यात आलेले आहे. या मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांचे या अभियानामध्ये नेहमी मार्गदर्शन असते तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त कामांमध्ये सहभाग नोंदवावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी वृक्ष लागवड व संवर्धन अभियान, जलसंधारण उपक्रम, कचरा व्यवस्थापन उपक्रम, ऊर्जा बचत उपक्रम,जैवविविधता संरक्षण उपक्रम उपक्रमाविषयी मार्गदर्शन या प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा ब्रम्हनाथ मेंगडे, ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ शंकर धांडे डॉ जगन्नाथ चव्हाण व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.