आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकीत द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय कार्यशाळा संपन्न

शिरपूर : आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर, नाशिक द्वारा ‘इंडस्ट्रीअल अॅप्रोच इन इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयावर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळेत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला. अशी माहिती महाविद्यालायाचे संचालक प्रा डॉ जे बी पाटील यांनी दिली.

Four day workshop concluded for second year students of RC Patel Autonomous Engineering

आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात सतत वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षणासाठी सेमिनार, वेबिनार, वर्कशॉप व इंटर्नशिप सारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. यासाठी औद्योगिक क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र, यांतील तज्ञ मंडळींना आमंत्रित करून वरील उपक्रम आयोजित केले जातात. नुकतेच नाशिकस्थीत इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर मार्फत शिक्षण आणि उद्योग यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासावर भर देत चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटरने आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या द्वीतीय वर्ष इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन्स या दोन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या चार दिवसीय प्रशिक्षण केंद्रित कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळा इलेक्ट्रिकल विभागासाठी २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत तर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशनसाठी ३१ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२४ या दिवसात पार पडल्या.

Advertisement

या कार्यशाळेत “कंपोनंट आयडेंटीफिकेशन अॅण्ड टेस्टिंग प्रॅक्टिस, असेम्ब्ली, सोल्डरिंग, डीसोल्डरिंग टिप्स, चेकिंग अॅण्ड कम्पॅरीजन विथ स्टॅंडर्ड व्हॅल्युज्, आयडेंटीफिकेशन ऑफ व्हेरीअस पॉसीबल फॉल्टस युजिंग डीएमएम, प्रोजेक्ट असेम्ब्ली अॅण्ड देअर कनेक्शन अॅण्ड टेस्टिंग आणि पीसीबी सर्किट स्टडी” या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. अभियांत्रिकी पदवी अभ्यासकांना अत्याधुनिक उत्पादक कौशल्यातील प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद होता.

इलेक्ट्रिकल विभागाकडून ४२ तर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन्स या विभागाकडून १११ अश्या एकूण १५३ विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा लाभ झाला. कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरल्या असून विद्यार्थ्यांना संबंधित विषया सोबत त्यांच्या भविष्यातील कार्यक्षेत्रात आवश्यक असणारे ज्ञान सुद्धा चांगल्या प्रकारे प्राप्त झाले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालायचे संचालक डॉ जे बी पाटील यांच्या हस्ते झाले. या उपक्रमासाठी तज्ञ प्रशिक्षक म्हणून  इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर, नाशिकचे संचालक संजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभाग व इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन्स अभियांत्रिकी विभागाकडून करण्यात आले असून त्यांच्या यशस्वितेसाठी इलेक्ट्रिकल विभागाकडून कार्यशाळेचे समन्वयक प्रा कृणालकुमार गांधी व प्रा रुपेश पाटील तर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन्स या विभागाकडून समन्वयक प्रा के एच सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशस्वी उपक्रमांबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ के बी पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ जे बी पाटील, उपसंचालक डॉ पी जे देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा एस पी शुक्ल, विभाग प्रमुख प्रा डॉ एस ए पाटील, प्रा डॉ व्ही एस पाटील, प्रा जी व्ही तपकिरे, प्रा पी एल सरोदे, डॉ एस व्ही देसले, डॉ आर बी वाघ, डॉ डी आर पाटील ,डॉ यु एम पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा एम पी जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page