प्रजासत्ताक दिनानिमित्त सावंतवाडीमध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे महिला मार्गदर्शन मेळावा
कोल्हापूर : दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका करवीर, येथे महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शिवाजी विद्यापीठ समाजकार्य विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. उर्मिला दशवंत आणि पंचायत समिती करवीर उमेद अभियानाच्या प्रभाग समन्वयक पूजा शिंदे उपस्थित होत्या. त्यांनी बचत गटाविषयी मार्गदर्शन, बचत गटाची रचना तसेच सरकारच्या बचत गटा अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती , तसेच महिला व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक ही चर्चा केली. त्यांनी गावातील महिलांना व नागरिकांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.
विद्या मंदिर सावंतवाडी चे मुख्याध्यापक अर्जुन तांदळे, सहाय्यक शिक्षक दीपक दगडखैर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य मनीषा सावंत, विठ्ठल सावंत, मोहन सावंत, सुष्मिता सावंत, अंगणवाडी सेविका सुनंदा नाईक, तसेच या कार्यक्रमाचे संयोजन समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी स्वप्निल बारवाडे, प्रेम भोसले, क्रांती कोलप, सारिका पाटील यांनी केले.