श्याम बेनेगल: ‘समांतर’ स्त्री प्रधान चित्रपटाचे अग्रणी’ – राज्यस्तरीय चर्चासत्राचे ताराबाई स्त्री अभ्यास केंद्रात उदघाटन

छत्रपती संभाजीनगर : ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ द्वारा श्याम बेनेगल: ‘समांतर ‘ स्त्री प्रधान चित्रपटाचे अग्रणी’ या विषयावर दि 12 व 13 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि अभ्यासक डॉ अनिल साळवे यांनी केले. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा मुस्तजीब खान, इंग्रजी विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी चर्चासत्र समन्वयक डॉ अश्विनी मोरे तसेच ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ निर्मला जाधव यांची उपस्थिती होती.

उद्घाटनपर मार्गदर्शन करत असताना डॉ अनिल साळवे यांनी स्पष्ट केले की शिक्षणामध्ये शिकवले गेलेले धडे हे वास्तविकतेला धरून असले पाहिजेत. लहानपणी अभ्यास्क्रमात शिकलेले बहुतांश धडे उपयोगाला येताना दिसत नाहीत. श्याम बेनेगल, सत्यजित रे जर आपल्या अभ्यासक्रमात असतील तर आपल्या सभोवतालातून चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट अभ्यासक घड़तील ऐसे प्रतिपादन अनिल सालवे यांनी केले.

चर्चासत्राचे प्रमुख व्याख्याते प्रा मुस्तजिब खान यांनी श्याम बेनेगल यांनी भारतीय चित्रपटसृष्टिला दिलेल्या योगदानाचा आढावा घेताना बेनेगल यांच्या चित्रपटातील आशय आणि सादरिकरण यांचे पारंपरिक मुख्यप्रवाही चित्रपटांपासून असलेले वेगळेपण यांची विस्तृत चर्चा केली. तसेच चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून गांभिर्याने अभ्यास करण्याची गरज आहे. कारण चित्रपट हे केवळ समाजाचा आरसा नसून जसा समाजतून चित्रपट घडवले जातात तसेच समाजाला घडवण्याचे काम चित्रपट करत असतात.

आणि म्हणून चित्रपटांची कथा आणि नायक- नायिका यांच्या पलीकडे चित्रपटांचे नेपथ्य, आवाज, रंग, कॅमेरा, संगीत, पोषाख इत्यादी अनेक गोष्टिंमधून चित्रपटाचा आशय अधोरीखेत केला जातो. म्हणून चित्रपट पाहतांणा या सर्व बाबीकड़े आपण काळजीपूर्वक बघितले पाहिजे. श्याम बेनेगल यांचे हेच वेगळेपण आहे की चित्रपटाच्या या सर्व बाबीं मध्ये सामान्य लोक आणि त्यांचे दृष्टिकोण परावर्तित करण्याचा प्रयत्न केले. मात्र ही अतिशय खेदाची बाब आहे की बॉक्स ऑफिसच्या गल्ल्याच्या आधारावरती चित्रपटाची लोकप्रियता ठरते. त्यामुळेच श्याम बेनेगल यांनी लोकसहभागातुन निर्माण केलेल्या मंथन या भारतातील पहिल्या चित्रपाटाचे महत्व अधोरेखित केले.

Advertisement

केवळ चित्रपट नाही तर स्मिता पाटील, शबाना आझमी, नसरुद्दीन शहा, ओम पुरी अमरीश पुरी, ओम पुरी यासारखे कलाकार देखील श्याम बेनेगल यांची देण असल्याचे प्रा. मुस्तजिब खान यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की भारतीय चित्रपटसृष्टी ही जागतिक पातळीवर द्वितीय स्थानावर आहे. परंतू तरिही काही अमूलाग्र बदल करण्यात आपण मागे आहोत.

अमेरिकेमध्ये धोरणात्मक व शासकीय पातळीवर हा निर्णय झालेला आहे की त्यांच्या निर्मित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटात आफ्रिकन अमेरिकन कॅरेक्टर असलेच पाहिजेत. शिवाय ते केवळ साफ सफाई अन्यथा इतर साध्या कामात नाही तर मोठ्या अधिकार पदावर कार्यरत असणारे असआखविले पाहिजे. यातून आपसूकच चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक बदलाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल ठरते. भारतीय चित्रपटांच्या संदर्भात मात्र आपल्याला हे खूप दुरचे स्वप्न असल्याचे दिसून येते.श्याम बेनेगल यांनी चित्रपटांना वास्तावाचे आयाम देण्याची सुरु केलेली परंपरा काही प्रमाणात पा रनजीत, नागराज मंजुळे सारख्या दिग्दर्शक पुढे चालवताना दिसतात असे प्रतिपादन प्रा मुस्तजिब खान यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना केंद्राच्या संचालक डॉ निर्मला जाधव यांनी स्त्री अभ्यास केंद्राच्या उपक्रमांची माहिती देत केंद्राच्या अभ्यासक्रमातील चित्रपटांच्या आधारित अभ्यासक्रम सामाजिक दृष्टिकोण विकसित करण्यास कसे उपयुक्त ठरतात ते नमूद केले तसेच श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा आढावा घेताना त्यांचे वेगलेपण अधोरेखित केले. केले.दुपारच्या सत्रात श्याम बेनेगल दिग्दर्शीत ‘निशांत’ व ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आलें.

चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ‘श्याम बेनेगल आणि समांतर चित्रपट’ या विषयावर प्रा मुस्तजीब खान यांचे व्याख्यान होईल. दुसऱ्या सत्रात ‘श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर प्रा माधुरी दीक्षित यांचे व्याख्यान होईल. तर समारोप सत्रात प्रा निशा मुडे, संचालक, स्त्री अभ्यास विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या उपस्थित राहणार आहेत.

चर्चासत्राचे सूत्रसंचालन व पाहुण्याचा केंद्राचे विद्यार्थी धम्मपाल चाबुकस्वार यांनी केले तर आभारप्रदर्शन रामदास येले यांनी केले. यावेळी विद्यापीठातील प्रा संजय पाइकराव, तिलोतम्मा बगाडे, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील कर्मचारी डॉ सविता बहिरट, संतोष लोखंडे संजय पोळ तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page