अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-2023 विद्यापीठीय पर्यायी परीक्षा घेण्यात येणार

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातंर्गत क्रीडा, सांस्कृतिक, आविष्कार, आव्हान, उत्कर्ष अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी व विद्यापीठाच्या संबंधित अधिका-यांनी प्रमाणित केलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठीय पर्यायी परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा विभागाने कळविल्यानुसार, अमरावती जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा ही श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (118) या परीक्षा केंद्रावर, अकोला जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (205), बुलडाणा जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा (302), यवतमाळ जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ (401), वाशिम जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा आर. ए. महाविद्यालय, वाशिम (701) तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थ्यांची हिवाळी – 2023 परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना असेही सूचित करण्यात येते की, विद्यार्थ्यांचे हिवाळी-2023 परीक्षेकरीता देण्यात आलेले परीक्षा क्रमांक व प्रवेशपत्र हे पर्यायी परीक्षेकरीता कायम राहतील.

तसेच वेळापत्रक व परीक्षा केंद्रनिहाय रोललिस्ट विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, याची सर्व विद्यार्थी, पालक, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्र, महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी नोंद घ्यावी व अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील यांचेशी 9763833969 या संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com