पद म्हणजे काय असते….?
पद म्हणजे काय असते….!
कोणत्याही माणसाचे महत्व पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही तर तो त्या पदाला किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम,कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो… यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो, पदामुळे तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे, ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, पद कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे,असे माणसांशी वागले पाहिजे !,
Position
नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते.,
म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा,तरच लोक तुमच्या सोबत राहतील……
प्राचार्य डॉ आमले एस एस