उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ घेण्यात आली
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने गुरूवार दि ९ मे रोजी “तारीख तेरा, मतदान मेरा ” या मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ घेण्यात आली.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा निवडणूक प्रचार प्रसार प्रमुख तथा जिल्हा समाजकल्याण आयुक्त योगेश पाटील यांनी ८ मे रोजी जळगाव जिल्हयातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक घेऊन “तारीख तेरा, मतदान मेरा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने रासेयो कक्षाच्या वतीने गुरूवारी अनेक विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले व त्यांना मतदानाची शपथ दिली. कुलसचिव डॉ विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांच्यासह विभागीय समन्वयक डॉ संजय पाटील, प्रा योगेश पुरी, डॉ गोपाल निंबाळकर, डॉ बिजवस्नी यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.