उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारत सरकार युवा व क्रिडा मंत्रालय, रा से यो प्रादेशिक कार्यालय, पुणे तसेच रा से यो कक्ष विद्यापीठ आणि सामाजिक शास्त्र प्रशाळेतील समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विभागाने शनिवार दि ३० मार्च रोजी स्वच्छता कृती योजना अंतर्गत स्वच्छता अभियान आणि शहीद दिना निमित्त मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे ब्रँण्ड अॅम्बेसेडर रणजितसिंग राजपूत, रेडिओ जॉकी देवा व शिवानी तसेच रा से यो संचालक डॉ सचिन नांद्रे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा अजय पाटील होते. यावेळी प्रा योगेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थी रोशन मावळे व प्रदीप गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली भित्तीपत्रकाचे सादरीकरण करण्यात आले. राजपूत यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. डॉ मनोज इंगोले यांनी आभार मानले.