केंद्रीय परिषदांच्या अध्यक्षांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट

संशोधन आणि शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेेचे – अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांचे प्रतिपादन

नाशिक : शैक्षणिक संस्था व महाविद्यालये यांनी संशोधन आणि शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित मार्गदर्शन बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, समवेत नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अनिल खुराणा, मेडिकल असेसमेंट अॅण्ड रेटिंग बोर्ड फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. रघुराम भट्ट, नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीचे सचिव डॉ. संजय गुप्ता, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव    डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement


        या प्रसंगी नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी सांगितले की, राज्यात आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी महाविद्यालयांची संख्या मोठया प्रमाणात आहे. शिक्षण प्रणातील तंत्रज्ञानाचा वापर करुन उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देणे शक्य होईल. यासाठी महाविद्यालयांचे ठराविक काळाने वस्तुनिष्ठ मूल्यांकन आणि क्षमता निर्देशांक ठरविणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य उद्दिष्टांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या मूल्यांकनाकरीता प्रणाली विकसित करुन त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. नवीन शिक्षण प्रणालीनुसार स्वयंपूर्ण भाग तयार करुन त्याचा अवलंब करण्यात यावा. संशोधनात वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात प्रोत्साहन द्यावे. प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वीत करणे गरजेचे आहे याअनुषंगाने शिक्षण प्रणाली विकसित करावी असे त्यांनी सांगितले. नवीन शिक्षण प्रणाली व त्यातील प्रशासकीय बाबी याबाबत नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अनिल खुराणा, मेडिकल असेसमेंट अॅण्ड रेटिंग बोर्ड फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. रघुराम भट्ट, नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीचे सचिव डॉ. संजय गुप्ता यांनी विद्यापीठाच्या आयुष विभागातील अधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी निमंत्रित मान्यवरांचे विद्यापीठ परिवारातर्फे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. अधिष्ठाता शैक्षणिक डॉ. मृणाल पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page