विश्वकर्मा विद्यापीठातर्फे स्पोर्ट्स फॉर ऑल चे आयोजन

 पुणे : विश्वकर्मा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा  विभागाच्यावतीने स्पोर्ट्स फॉर ऑल या उपक्रमांअंतर्गत  धायरी येथील ज्ञानगंगोत्री मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये १३  डिसेंबर २०२४ रोजी  विविध  क्रीडा प्रकारांचे आयोजन  केले  होते तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप केले.

 विश्वकर्मा  विद्यापीठातर्फे स्पोर्ट्स फॉर ऑल या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात  येते. मानवी जीवनामध्ये  तंदरुस्त राहण्याला अतिशय महत्व आहे.  क्रीडाप्रकार तंदरुस्त राहण्यास मदत करतात.  शालेय जीवनापासून  खेळाची आवड निर्माण झाल्यास  शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत  होते. खेळाविषयी आवड निर्माण व्हावी आणि गरजू विद्यार्थ्यांना  क्रीडासाहित्य उपलब्ध  व्हावे यासाठी   विश्वकर्मा  विद्यापीठाने या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

Advertisement

Vishwakarma University organizes Sports for All

या उपक्रमाबाबत विश्वकर्मा विद्यापीठाचे  क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. चेतन चौहान म्हणाले  की,  “खेळ हा  सर्वाना एकत्रित करणारा एक महत्वाचा  घटक आहे आणि प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करून चमकण्यासाठी एक संधी मिळावी,  यासाठी आम्ही  प्रयत्न करत असतो.

समावेशकतेला प्रोत्साहन देणे आणि खेळांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा विचारशील उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात विविध अनुकूलित क्रीडा क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  सर्व क्षमतांच्या मुलांनी सहभाग घेतला आणि आनंद घेतला.

याशिवाय, सहभागी मुलांना क्रीडा गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन  विद्यापीठाच्या क्रीडा समन्वयक प्रा. प्राजक्ता  कापडणीस आणि प्रा. कीर्ती  देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page