उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विलास बाविस्कर, दशरथ बोरसे आणि समाधान पाटील सेवानिवृत्त

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेतुन वरिष्ठ सहायक विलास बाविस्कर, दशरथ बोरसे आणि कुशल परिचर समाधान पाटील हे तिघे दि ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले असून कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.

विलास बाविस्कर हे विद्यापीठाच्या वित्त विभागात आणि दशरथ बोरसे हे पात्रता आणि अभ्यास मंडळ विभागात वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. समाधान पाटील हे कुशल परिचर म्हणून संगणक शास्त्र प्रशाळेत कार्यरत होते. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, पतपेढी यांच्यावतीने देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा योगेश पाटील उपस्थित होते. प्रवीण चंदनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com