गोंडवाना विद्यापीठात विदर्भ युनिव्हर्सिटी विद्यार्थी परिसंवाद स्पर्धा संपन्न

परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी दिशा दर्शक – प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी परिसंवाद हे दिशादर्शक असतात, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.
शासकीय विज्ञान महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ युनिव्हर्सिटी विद्यार्थी परिसंवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पोस्टर प्रेजेंटेशन व सेमिनार प्रेजेंटेशन स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी, विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर रेवतकर तसेच सचिव डॉ. जितेंद्र रामटेके, कोषाध्यक्ष डॉ. देवेंद्र नंदनवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुभाष कोंडावर, यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Advertisement
Vidarbha University Student Symposium Competition concluded at Gondwana University

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंडवाना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग, विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर असोसिएशन व शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली यांच्या वतीने या दोन दिवसीय विद्यार्थी परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, भौतिकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली ही स्पर्धा विद्यापीठाद्वारे प्रथमच घेण्यात आली. ही बाब फारच कौतुकास्पद असून निश्चितच यामधुन विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळेल.

प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागाचे स. प्रा. डॉ. नंदकिशोर मेश्राम यांनी केले, आभार स. प्रा. विकास पुनसे यांनी मानले ,तर संचालन स. प्रा.डॉ. अपर्णा भाके यांनी केले. याप्रसंगी डॉ. मोहरकर, गणित विभागाचे प्रा.डॉ. सुनील बागडे, स. प्रा.डॉ. प्रितेश जाधव आदी मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवसीय परिसंवादादरम्यान विद्यार्थ्यांना डॉ. सुधीर टिपले यांनी टेलिस्कोप द्वारे चंद्र व ग्रह यांचे निरीक्षण करवून मार्गदर्शनही केले.

स्पर्धेमध्ये विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठातील २८ महाविद्यालयातील १४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्राच्या स. प्रा. सहकार्य केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांची मोठयासंख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page