गोंडवाना विद्यापीठात विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या ४७ व्या वार्षिक अधिवेशनाचा समारोप
अर्थशास्त्रातील नव्या संकल्पनांना समाजात नव्याने रुजवावे लागेल – कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
गडचिरोली : अर्थशास्त्रातील नव्या संकल्पनाच्या आधारे पर्यायी आर्थिक विकास सिद्धांताची निर्मिती करून देशाच्या आर्थिक विकासाचे नवे प्रारूप मांडणे हॆ आजघडीला अर्थशास्त्रज्ञासमोर नवे आव्हान आहे. असे मत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मांडले. विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे ४७ वे वार्षिक अधिवेशन नुकतेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे संपन्न झाले. यावेळी अर्थशास्त्र परिषदेच्या समारोपीय सोहळ्यात व्यासपीठावर समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आज संपूर्ण जग आर्थिक विकासाच्या आघाडीवर आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडले असताना अशा कठीण परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था ही अत्यंत वेगाने प्रगती करीत आहे हॆ खरोखर जगाला आश्चर्याचा धक्का देणारी बाब आहे. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने ७ ते ७.५% टक्के आर्थिक विकासाचा दर टिकवून जगातल्या विकसित अर्थव्यवस्थे समोर एक नवे आव्हान उभे केलेले आहे. यानिमित्याने आयोजित करण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या तांत्रिक सत्रात अशाच विषयांची निवड करून त्यावरती चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे.
आज काळाच्या ओघात जगासमोर नवीन आव्हाने उभे राहिलेली आहेत. अशा स्थितीत आर्थिक नव संकल्पनांना जवळ करून त्यावरती चर्चा करून सर्वसामान्य उपाया सोबतच देशाला आर्थिक विकासाच्या नव्या संकल्पनाची रुजवणूक समाजात करणे आवश्यक आहे. आजची पश्चिमात्य संकल्पनेवरील मांडलेली अर्थशास्त्रीय सिद्धांत ही विस्कळीत झालेली आहे. त्याबरोबरच त्यांची उपयोजिता सुद्धा संपलेली आहे, परंतु आपल्या देशात यापूर्वी ही सिद्धांत जशीच्या तशी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला लावण्याऐवजी नवीन देशी आर्थिक प्रारूप व सिद्धांत शोधणे आवश्यक आहे. आज खऱ्या अर्थाने पर्यायी आर्थिक विकासाचे सिद्धांत हे नव्याने मांडून त्याची नव निर्मिती करणे व त्याचे कार्यान्वयन करणे आवश्यक आहे अशी परखड भूमिका यानिमित्ताने डॉ. प्रशांत बोकारे यांनी मांडली. यावेळी व्यासपीठावरती गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. करमसिंग राजपूत, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. हसन अली हुद्दा, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राजू श्रीरामे, डॉ. आर वाय माहोरे, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यासमंडळ डॉ .जे. एम. काकडे तसेच प्राचार्य डॉ. खत्री महाविद्यालय तुकुम , चंद्रपुर ,डॉ. मुक्ता जहागीरदार तसेच विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. विठ्ठल घिणमिने तसेच अमरावती विभागाचे सचिव , डॉ. संजय कोठारी व अर्थमिमांसा मासिकाचे संपादक डॉ. धीरज कदम यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष डॉ. करमसिंग राजपूत यांनीही मार्गदर्शन केले.
या समारोपिय सोहळ्यानिमित्याने समयोचित भाषणे झाली. यावेळी विदर्भातील तिन्ही विद्यापीठातून जवळपास दीडशे प्रतिनिधींनी हजेरी लावलेली होती. परिषदेच्या विविध सत्रात अनेक संशोधकांनी आपली शोधनिबंध सादर केली. या परिषदेला उपस्थित असलेल्या विविध प्रतिनिधिनी अशा प्रकारचे सर्वोत्कृष्ट आयोजन गोंडवाना विद्यापीठाने केल्याबद्दल सर्वांनी आयोजकांचे अभिनंदन केले. भविष्यात अशाच प्रकारच्या अर्थशास्त्र परिषदांचे गुणवत्तापूर्ण आयोजन कसे असावे याचा एक नवा पाठ या निमित्ताने जगासमोर ठेवल्याचे सर्व उपस्थित प्रतिनिधीनी यावेळेस आपले मत व्यक्त केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी, सर्व विद्यापीठीय यंत्रणा, पदव्युत्तर उपयोजित अर्थशास्त्र विभाग, विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन स. प्रा. डॉ. धैर्यशील खामकर, आभार समन्वयक स. प्रा. डॉ. शिल्पा आठवले यांनी मानले.