उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकपालपदी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकपालपदी छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vice Chancellor Vilas S Sapkal

विद्यापीठ अनुदान आयोग तसेच भारत सरकार यांच्या असाधारण भाग-३ खंड ४ प्रमाणे प्रकाशित केलेल्या राजपत्रानुसार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मान्यतेने प्रा. विलास सपकाळ यांची विद्यापीठाच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रूजू झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षा करीता किंवा त्यांच्या वयाच्या ७० वर्षापर्यंत यात जे आधी असेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती राहील. विद्यापीठाशी संलग्नित तीनही जिल्हयातील महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया लोकपाल यांच्यामार्फत केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com