आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात कुलगुरु यांचा विद्यार्थ्याशी संवाद

आरोग्य तज्ज्ञ होण्याबरोबर उत्तम नागरिक व्हावे – कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)

नाशिक : समाजात चांगले काम करायचे असेल, देशाला अधिक सबळ करायचे असेल तर स्वतः उत्तम नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. आरोग्य क्षेत्राचे उत्तम कौशल्ये आणि ज्ञान घेण्याबरोबर  व्यक्तीमत्वाचा सर्वागिण विकास करुन समाजासाठी उपयुक्त ठरेल असे विद्यार्थ्यांनी कार्य करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष तसेच दुरस्थ पध्दतीने संवाद साधला. या कार्यक्रमास प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, उपकुलसचिव डॉ सुनिल फुगारे, उपकुलसचिव डॉ आर टी आहेर, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाचे विविध संशोधन प्रकल्प, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम विद्यापीठातर्फे मोठया प्रमाणात राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विद्यापीठाकडून मोबाईल अॅप्सची निर्मिती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा काळात येणारा तणाव व मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व खेळात सहभाग घेतला पाहिजे. संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठात ‘दिशा’ कक्ष सुरु करण्यात आला असून नवीन संशोधनासाठी तो उपयुक्त ठरेल.

विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. आरोग्य शिक्षण घेतांना शिक्षण, संशोधन व सामाजिक बांधिलकी आदींचा विकास होणे गरजेचे आहे. आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व घडविण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील आहे असे त्यांनी सांगितले. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून नकळत होणाÚया चूका टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल त्यांनी माहिती दिली.

Advertisement

विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाचे विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणाबरोबर संवाद कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येतात. संशोधन, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महत्वाकांक्षी असावे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘कुलगुरु कट्टा’ च्या माध्यमातून विद्यापीठाकडून अडचणी समजून निराकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्ष संवाद व्हावा जेणेकरुन विद्यार्थी आपले शैक्षणिक प्रश्न, अडचणी कुलगुरु महोदया यांच्याकडे मांडू शकतील या संकल्पनेला कुलगुरु कट्टच्या माध्यमातून मूर्त रुप देण्यात आले असे सांगितले.

याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, उपकुलसचिव डॉ सुनिल फुगारे, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी केले. या कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच नाशिक येथील डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, एम जी व्ही एम चे के बी एच दंत महाविद्यालय, मोतिवाला होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, धन्वंतरी होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, ए एस एस आयुर्वेद महाविद्यालय, धामणगावचे एस एम बी टी आयुर्वेद महाविद्यालय, धुळयाचे जव्हार मेडिकल फाऊंडेशनचे ए सी पी एम दंत महाविद्यालय, संमगनेरचे रुक्मीणी आयुर्वेद महाविद्यालय, चांडवडचे के बी आबड होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकचे गोखले भौतिकोपचार महाविद्यालय, भोसला परिचर्या महाविद्यालय, वामनराव इथापे होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठात मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर, अविनाश सोनवणे, रेख करवल, समाधान जाधव, अर्जुन नागलोत, राजेंद्र दिवे, दिप्तेश केदारे, रोहित भोये, नाना परभणे यांनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page