कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रक्षेत्रास भेट

यावर्षी विद्यापीठ घेणार दोन हजार एकरावर खरीप हंगामातील बिजोत्पादन

राहुरी : कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर, वेगवेगळ्या संशोधन योजना, कृषि महाविद्यालये, कृषि तंत्र विद्यालये, कृषि विज्ञान केंद्र यांच्या प्रक्षेत्रावर खरीप २०२४ मध्ये दोन हजार एकरावर खरीप हंगामातील भात, मूग, उडीद, तूर, तीळ, कापूस, मका, सोयाबीन व भुईमुग पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा मूलभूत बिजोत्पादन कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांकाप्रमाणे राबविण्यात आला आहे.

कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील यांची विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रक्षेत्रास भेट

केंद्र व राज्य शासनाच्या उत्पादन लक्षांकापेक्षा तीन पट जास्त उत्पादन लक्षांकाचे धेय ठेवून विद्यापीठाने कार्यक्षेत्राच्या अंतर्गत असणाऱ्या बिजोत्पादन प्रक्षेत्रावर दहा हजार क्विटल बियाणे उत्पादन लक्षांकासाठी कार्यक्रम राबविला आहे.

Advertisement

खरीप २०२४ मध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ४७५० क्विटल मुलभूत बियाणे वेगवेगळ्या शासकिय व निमशासकिय बिजोत्पादन संस्थांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले. विक्रीतून शिल्लक राहिलेले १००० क्विटल मुलभूत बियाणे सत्यप्रत दर्जात रुपांतरीत करुन शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. मुलभूत बियाणे विक्री पोटी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने खरीप २०२४ मध्ये वेगवेगळ्या बिजोत्पादन संस्थेशी १३५ सामंजस्य करार केले असून त्यापोटी विद्यापीठाला रुपये १५.९० लक्ष मिळाले व खरीप २०२४ मध्ये विद्यापीठाला बियाण्याच्या विक्रीतून रुपये ३ कोटी ४१ लाख रुपये मिळाले.

संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या अधिनस्त आलेल्या बिजोत्पादन क्षेत्राची ९० टक्के पेरणी झाली आहे. वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे बिजोत्पादन क्षेत्राची स्थिती चांगली आहे. कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यापीठाच्या गध्यवर्ती बिजोत्पादन प्रक्षेत्रास भेट दिली.

यावेळी प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे डॉ आनंद सोळंके, कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ पवन कुलवाल, प्रा बाळासाहेब शेटे, डॉ सोमनाथ धोंडे, डॉ अनिल सुर्यवंशी, डॉ हेमंत शिंदे, डॉ कैलास गागरे उपस्थित होते. कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील यांनी बिजोत्पादन प्रक्षेत्रास भेट दिल्यानंतर समाधान व्यक्त केले. यावेळी ब विभागाचे कृषि सहाय्यक बुवासाहेब न्हस्के यांनी ब विभागात बिजोत्पादन घेतलेल्या पिकांची सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page