दत्ता मेघे इन्स्टिटयुट कडून कुलगुरु डॉ माधुरी कानिटकर डि एस्सी पदवीने सन्मानित

आरोग्य विद्यापीठ परिवारातर्फे डॉ माधुरी कानिटकर यांचा सत्कार

नाशिक : विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प यांना वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिटयूटने डि एस्सी या मानद पदवीने सन्मानित केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठात नवनियुक्त लोकपाल डॉ प्रविण शिणगारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प समवेत विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलींद निकुंभ, नवनियुक्त लोकपाल डॉ प्रविण शिणगारे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ वर्षा फडके, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर सांगितले की, दत्ता मेघे इन्स्टिटयूटकडून मिळालेली डि एस्सी पदवीसाठी आपले सर्वांचे सहकार्य व पुढाकार महत्वाचा आहे. आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्या कडून मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. कामाची जिद्द व चिकाटी असली तर यश नक्की मिळते त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांच्या सहभागाने  कामाचा वेग पहाता लवकरच जागतिक पातळीवर नावलौकिक होईल असे त्यांनी सांगितले.

Advertisement

याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ मिलींद निकुंभ सांगितले की, कुलगुरु महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा वक्तशिरपणा व कामाची शिस्त भारावून टाकणारी आहे. त्यांना मिळालेला मानद पदवी हे त्याचे प्रतिक असून या उंचीवर जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे नवनियुक्त लोकपाल डॉ प्रविण शिणगारे यांनी सांगितले की, गुरुपोर्णिमा हा गुरुंचा सन्मान करण्याच्या दिवस आहे. शिक्षकांकडून शिकलेले मौल्यवान धडे आणि कौशल्य आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करावा. कुलगुरु महोदया आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत त्यांच्या प्रेरणेने अधिक चांगले कार्य करुन विद्यापीठाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी अधिक मदत होईल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे अॅड संदीप कुलकर्णी, राजेंद्र शहाणे, संदीप महाजन, राजेश इस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार संदीप राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासा विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page