वसंतराव नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 22 व 23 जानेवारीला
छत्रपती संभाजीनगर |
छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 22 व 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव देणारे हे दोन दिवसीय स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी सुप्रसिद्ध कवी व गीतकार श्री. अनंत राऊत हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून मा. नितीनजी राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तर समारोप कार्यक्रमासाठी डॉ. पंकजा वाघमारे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात
🎶 गीतबहार
💃 नृत्यझंकार
🎡 आनंदनगरी
🎭 महाराष्ट्राची लोकधारा
🎟️ वसंत लॉटरी
🧠 व्यक्तिमत्व विकास स्पर्धा
📚 वाडःमयीन स्पर्धा
असे विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व बौद्धिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे व स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. जगदीश भराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश असून विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
