वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे जलतरण स्पर्धेमध्ये यश

कोडोळी/ कोल्हापूर : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने जलतरण स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले. सातारा, कोल्हापूर व सांगली फार्मा स्पोर्ट्स असोसिएशन २०२३-२४ यांच्या अंतर्गत तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत सदर तीन जिल्ह्यातील विद्यार्थी वेगवेगळ्या खेळात सहभागी होतात. सदर महाविद्यालयातील प्रथम वर्ष डी फार्मसीचा कु तेजस लोहार यांने २००मीटर विभागात उपविजेता पदक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यासाठी त्याला संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले.

तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डॉ ए एस मंजप्पा व कार्यालयीन अधीक्षक वैशाली पोवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा शिक्षक प्रा. उमेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यादरम्यान महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com