वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा काखे येथे श्रमसंस्कार शिबिर संपन्न
कोडोळी / कोल्हापूर : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोली यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पुरस्कृत राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबीर मौजे ,काखे ता.पन्हाळा येथे नुकताच संपन्न झाला. हे श्रमसंस्कार शिबिर युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास या ब्रीद वाक्यावर राबविण्यात आला. हे शिबिर १३/०२/२०२४ते १९/०२/२०२४ या कालावधीत संपन्न झाले. या शिबिरादरम्यान गावातील स्वच्छता, गावातील नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षण, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, विद्यार्थी रक्तगट तपासणी शिबीर, गावातील नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर, महिला सबलीकरण, मतदान जनजागृती व माणुसकीची भिंत इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
या शिबिरासाठी श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काखे गावचे सरपंच राजश्री पाटील, उपसरपंच विजय पाटील, काखे विद्यामंदिर चे मुख्याध्यापक मधुकर निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. मंजाप्पा उपस्थित होते. ह्या शिबिरासाठी कार्यलयीन अधीक्षक वैशाली पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. उमेश पाटील व प्रा. गौरव केकरे यांनी केले. निवास पाटील, पांडूरंग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच स्वयंसेवक प्रतिनिधी श्रीकांत शिंदे अस्मिता कांबळे यांनी श्रम केले. यावेळी महाविद्यालयातील इतर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते