वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात विद्यापीठा अंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

कोडोळी : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोडोली येथे अग्रणी महाविद्यालया अंतर्गत नुकतीच हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या विविध फार्मसी महाविद्यालयासाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण १४ महाविद्यालये सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रसंगी कोल्हापूर विभाग प्रमुख डॉ. जॉन डिसुझा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. मंजप्पा तसेच विविध महाविद्यालयातील क्रीडा समन्वयक उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी विजेता तर भारती विद्यापीठ कोल्हापूर उपविजेता ठरले. संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांनी विजेता संघाचे अभिनंदन व कौतुक केले, तसेच इतर संघांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्रा. उत्कर्ष नागवेकर व सूत्रसंचालन प्रा. ग्रीष्मा पाटील यांनी केले. यादरम्यान महाविद्यालयातील इतर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com