व्हॅलेंटाईन डे, तरुणाईची भावना आणि आपली संस्कृती

व्हॅलेंटाईन डे, तरुणाईची भावना आणि आपली संस्कृती

“व्हॅलेंटाईन डे” म्हटलं की तरुण-तरुणींमध्ये प्रेमाचे धुमारे फुटतात. नेमकं या दिवशी तरुण-तरुणी आपले प्रेम व्यक्त करतात. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ही खूपच लोकप्रिय आहे की मी “त्याला” किंवा “तिला” व्हॅलेंटाईन डे प्रपोज करेल म्हणजे तिच्यावर करत असलेल्या प्रेमाची भावना व्यक्त करेल. हे आपण मागील दशकभरात खूप मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळाले आहेत. नेमकं हा दिवस असतो काय जाणून घेणार आहोत कॅम्पस कट्टाच्या आपला कट्टा मध्ये….

तर चला जाणून घेवू..

Velentine Day

का, कधी व कसा साजरा करतात हा दिवस “यो” ?

“व्हॅलेंटाईन डे” प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो, हा एकप्रकारे प्रेमीयुगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा दिवस आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तू आणि संदेश पाठवतात.

व्हॅलेंटाईन डेची “स्टोरी” काय आहे?

व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईनच्या नावाने साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईन बद्दल अनेक कथा प्रचलित आहेत पण सर्वात लोकप्रिय कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. क्लॉडियसने आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती. पण संत व्हॅलेंटाईनने अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. राजाला राग अनावर झाल्याने त्याने 14 फेब्रुवारी 269 रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवलं.


व्हॅलेंटाईन डे कसा सुरू झाला?

रोममध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत ‘Lupercalia’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले एका डब्यातून मुलींच्या नावे काढत असत. या उत्सवात ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरत असत आणि कधी कधी ते लग्नबंधनात देखील बांधली जात. तेथील चर्च ख्रिश्चन उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात केली. यानंतर, लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन नावाचा वापर करू लागले.


व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतात ?

मित्रांसमवेत वेळ घालवून साजरा करण्यासोबतच हा दिवस होममेड कार्ड, मिठाई, गुलाब, रोमँटिक डेट, रोमँटिक डिनर किंवा लंचसाठी बाहेर जाऊ शकता किंवा कोणत्याही रोमँटिक ठिकाणी वेळ घालवू शकता. या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना आवडत्या भेटवस्तू किंवा एखादा गोड पदार्थ देऊन नात्यातील स्नेह वाढवू शकता. आणि महत्वाचे म्हणजेच या दिवशी एखाद्यावरील प्रेम व्यक्त करू शकता.व्हॅलेंटाईन डे मुलगा किंवा मुलगी कोणा एकासाठी नसून हा दिवस दोघांसाठी असतो. हा दिवस दोघेही साजरा करू शकतात. हा आनंदाचा किंवा प्रेमाचा उत्सव केवळ जोडप्यांसाठीच नव्हे तर मनातील प्रेमासाठी साजरा केला जातो आणि आपल्या मनातील ते प्रेम कोणासाठीही असू शकते. त्यामुळे हा दिवस तुम्ही आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्रमैत्रीण कोणासाठीही साजरा करू शकता. आपल्या मनातील व्हॅलेंटाईन कोणीही असू शकतं.

Advertisement


जर बघावयास गेले तर हा दिवस प्रेमाचं प्रतीक असलेला पवित्र दिवस आहे पण आजकालच्या तरुण तरुणी यांनी या दिवसाला बदनाम करण्याचे काम केले आहे.यात एकतर्फी प्रेम करणारे तरुण-तरुणी उगाच प्रपोज करून सामाजिक माध्यमांवर व्यक्त होऊन समोरच्या व्यक्तीची बदनामी होईल याची काळजी न बाळगता खुलेआम प्रेम करत असल्याचे म्हणतात.आय लव यू, आय लाईक यू…अशा कमेंट पोस्ट व्हाट्सअप, फेसबुक व ट्विटर यावर टाकत प्रेमाला बदनाम करण्याचे काम होत आहे. या दरम्यान हिंदुत्ववादी संघटना कट्टर या दिवसाला विरोध करतात.खरे जर बघायला गेले तर भारतात या संस्कृतीनुसार या दिवसाला महत्त्व नाहीये . पाश्चिमात्य संस्कृती आपला देश अनुकरण करतोय याचे आपल्याला वाईट वाटते पण भारत हा विविध संस्कृती परंपरा चाली रूढी यांनी बनलेला देश आहे म्हणून आपल्या देशाला वेगळे महत्त्व आहे त्यामुळे संकुचित विचार न करता आत्मसात करत “वसुधैव कुटुम्बकम” प्रमाणे आपणास सर्व समावेशक व्हावेच लागेल.


आपल्या मराठी संस्कृती मध्येही प्रेम हे खूप पवित्र मानले गेले आहे आणि त्यावर विविध साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे एकच एक दिवस एकच व्यक्ती वर प्रेम न करता या जगण्यावर प्रेम करा असा संदेश मराठी साहित्य देतो

या जगण्यावर…
या जन्मावर ….शतदा प्रेम…..!


प्रेम हे प्रत्येक भारतीयाच्या चराचरात, धर्म व संस्कृती यात अंतर्भूत के आहेत. त्यामुळे विशेष दिवस साजरे करण्याची गरज नाही आहे. भगवंत श्रीकृष्ण हे प्रेमाचे प्रतीक आहेत. त्यांचे राधाचे असलेले प्रेम सर्वांना माहित आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती प्रेमाला खूप महत्त्व आहे. प्रेम म्हणजे फक्त आवड नव्हे, तो किंवा ती किंवा आवडतात म्हणजेच प्रेम आहे हे आपण समजतो हे चुकीचे आहे.


दोन वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या देशाच्या सैनिकांच्या वाहनावर पुलवामा येथे बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यात आपले जवान शहिद झाले होते. यामुळे विरोध करण्यापेक्षा सैनिकांवर मनापासून प्रेम करत त्यांच्यासाठी हा दिवस विशेष साजरा करू शकता सैनिकांवरचे देशा वरचे प्रेम व्यक्त करून या देशाला आपण बळकट बनवू शकतो.


आवड ही आकर्षणातून निर्माण होते. आकर्षणातून निर्माण झालेल्या गोष्टी सहवासात आल्यानंतर त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक साथ देत असतील, दोघांचे विचार आचार एकमेकांना पटत असेल तर पुढे निखळ मैत्री निर्माण होते.तसेच यातून प्रेम फुलत जाते. त्यामुळे प्रेम व आकर्षण यात फरक काय आहे हा सर्व तरुण- तरुणींनी समजून घ्यावे.

या दिवशी “प्रपोज” करताना आपण समोरच्याची भावना तुडवत तर नाही आहोत याची काळजी घ्यावी. जर एखाद्याला भीती वाटत असेल आणि ते जर शक्य नसेल तर तुम्ही एकदा पर्सनली भेटायच, जे आहे ते बोलून टाका पण मनात उगाच गैरसमज वाढवत जाऊ नका ज्यामुळे पवित्र प्रेम बदनाम होईल.


तरुण – तरुणी नेहमी फक्त मुला मुलींच्या सौंदर्याला भाळून विचार करतात. यात सौंदर्य हे नश्वर आहे हे तरुणींनी तसेच तरुणांनी लक्ष द्यावयास हवे. खूप चांगला दिसतोय आणि आवडते म्हणजेच मी प्रेम करतो असे नव्हे, प्रेम हे दोघांच्या समजूतदारपणा यांवर टिकलेले असते. तिथेच बहरते जर एकमेकाचे दोघे चांगल्या-वाईट गोष्टीत समजून घेत असतील तर ते प्रेमच …!

पण आकर्षण कामा नये. आकर्षण हेच प्रेमाची पहिली पायरी आहे पण आकर्षण नंतर आपण खरंच दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो ? का सुख-दुःखात सहभागी होऊ शकतो का ? आचार-विचार स्वभाव एकत्र राहून सहवास चांगला राहू शकतो का? या गोष्टीचा विचार करा व मगच प्रेमाच्या मागे जा. आपले करियर हे सर्वप्रथम “पहिले प्रेम” आहे हे लक्षात असावे. या दिवसाचा विरोध करण्यापेक्षा किंवा अति उत्साहात साजरा करण्यापेक्षा नेमके काय आहे हे समजूनच दिवस साजरा करा तुम्हा सर्वांना पवित्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ. सुनिल राजपुत
संपादक

Campuskatta.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page