उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक महोत्स्व “उत्कर्ष” चा समारोप मोठ्या जल्लोषात संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष” या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वसााधारण विजेतेपद तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उपविजेतेपद प्राप्त केले. तर यजमान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या संघाना विभागून तृतीय स्थान प्राप्त झाले.‍

दि.१७ ते २० मार्च या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक महोत्स्व “उत्कर्ष” चा समारोप मोठ्या जल्लोषात बुधवारी झाला. कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अभिनेते तथा मुंबई विद्यापीठाच्या अकादमी ऑफ थिएटर ॲण्ड आर्टसचे संचालक प्रा योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर यावेळी प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे, व्य प सदस्य नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, रा से यो संचालक डॉ. सचिन नांद्रे, समन्वयक प्रा विजय पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रमुख पाहूणे प्रा योगेश सोमण म्हणाले की, आपली आवड जोपासण्यासाठी, शिक्षक अथवा पालकांसोबत संघर्ष करावा लागला तरी तो करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी. कारण मारलेल्या मनाचा हिशोब कधीही करता येत नाही. कला ही ७५ टक्के स्वान्त्‍ सुखाय असली तरी कलेचे व्यवसायात रुपांतर करण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. केवळ गुण अथवा क्रेडीट यापुरते कलेकडे बघु नका ती कला अधिक वृध्दींगत करण्याचे आवाहन प्रा.सोमण यांनी केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा माहेश्वरी यांनी ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावे. केवळ स्पर्धेपुरते कलेकडे पाहु नये असे आवाहन केले.

प्रारंभी स्पर्धेचा आढावा डॉ. सचिन नांद्रे यांनी घेतला.  महोत्सवात १५ विद्यापीठाचे २७० विद्यार्थी आणि १५ संघव्यवस्थापक सहभागी झाले होते अशी माहिती डॉ. नांद्रे यांनी दिली.  सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीने गौरव घाटोळ (अकोला), गायत्री शिंदे (मुंबई), संघ व्यवस्थापकांच्या वतीने डॉ.धनंजय होनमाने (कोल्हापूर) व डॉ. संध्या सातपुते (नागपुर) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम पाटील यांनी केले.  व पारितोषिक वाचन डॉ. दिनेश पाटील यांनी केले. आभार डॉ.विजय पाटील यांनी मानले. यावेळी नांदेड विद्यापीठाचे रा.से.यो. संचालक डॉ. मल्लीकार्जुन करजगे व सोलापुरचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांचा सत्कार करण्यात आला. अधिसभा सदस्य दीपक पाटील, स्वप्नाली महाजन, नेहा जोशी, दिनेश खरात यावेळी उपस्थित होते.

“उत्कर्ष” स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-

कलाप्रकार निहाय विजेते

नृत्य विभाग : संकल्पना नृत्य –

प्रथम – पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर,

द्वितीय – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव,

तृतीय – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,

नाटय विभाग : पथनाट्य – प्रथम – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे, 

द्वितीय – मुंबई विद्यापीठ, मुंबई,

तृतीय – पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

संगीत विभाग, समूहगीत प्रथम – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर,

द्वितीय – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

तृतीय – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे, 

सूर/ताल/लोकवाद्य प्रथम– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

द्वितीय – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, तृतीय – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

भारतीय लोककला – प्रथम – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

द्वितीय – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,

तृतीय  – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

ललित कला विभाग, भित्तीपत्रक घोषवाक्यासह

प्रथम – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

Advertisement

द्वितीय – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर,

तृतीय – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव,

साहित्य  विभाग, निबंध

प्रथम – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती,

द्वितीय – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,

तृतीय – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

वत्कृत्व प्रथम – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,

द्वितीय – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,

तृतीय – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव

कविता प्रथम – डॉ.बाबासाहेबआंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,

द्वितीय – मुंबई विद्यापीठ,मुंबई,

तृतीय – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

छायाचित्रण विभाग, प्रथम – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव, द्वितीय – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,

तृतीय –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.

कलाप्रकार विभाग निहाय सर्वसाधारण विजेते

नृत्य विभाग उत्कृष्ट संघ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर

(प्रा. विलास चव्हाण फिरता चषक)

नाट्य विभाग उत्कृष्ट संघ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे (प्रा. रमेश देवकर फिरता चषक)

संगीत विभाग उत्कृष्ट संघ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर

(प्रा.भाऊ दायदार फिरता चषक)

ललित कला विभाग उत्कृष्ट संघ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे (प्रा. डी.जी.फोंडेकर फिरता चषक)

साहित्य विभाग उत्कृष्ट संघ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

(डॉ. अतुल साळूंके फिरता चषक)

छायाचित्रण विभाग उत्कृष्ट संघ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव 

(प्रा. प्रतिभा चिपळूणकर फिरता चषक)

सर्वोत्कृष्ट कलाकार (गोल्डन बॉय) विद्यार्थी – नयन गातीर, सावित्रीबाई फुल‍े पुणे विद्यापीठ,पुणे (डॉ.धनंजय माने फिरता चषक)

सर्वोत्कृष्ट कलाकार (गोल्डन गर्ल ) विद्यार्थिंनी – निधी पांचाळ, मुंबई विद्यापीठ, मुंबई

(डॉ.शाकेरा इनामदार फिरता चषक)

पथसंचलन पारितोषिक विजेते विद्यापीठ :-

प्रथम – (प्रा.तुकाराम शिंदे फिरता चषक) :- कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव द्वितीय – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे,

तृतीय – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, सर्वोत्कृष्ट संघनायक (पुरुष) (डॉ.प्रभाकर देसाई फिरता चषक) -डॉ.संभाजी मनुरकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड, सर्वोत्कृष्ट संघनायक (महिला) (डॉ.राजेंद्र भुयार फिरता चषक)- डॉ.संध्या सातपुते,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर ,

उत्कृष्ट रासेयो कार्य भित्तीचित्र –

प्रथम –  माधवी श्रीकांत पाटील फिरता चषक – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती,

द्वितीय – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर,

तृतीय – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

 उत्कृष्ट रासेयो कार्यप्रसिध्दी अहवाल –

प्रथम – (डॉ.दत्तात्रय गायकवाड फिरता चषक) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

द्वितीय – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव

तृतीय – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

उत्कृष्ट शिस्तप्रिय संघ विजेते विद्यापीठ :-

सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ (डॉ. प्रशांतकुमार विठ्ठलराव वनंजे फिरता चषक)- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,

सर्वसाधारण विजेते विद्यापीठ

विजेता सर्वोत्कृष्ट संघ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (डॉ.संजय चाकणे फिरता चषक)

उपविजेता सर्वोत्कृष्ट संघ  – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

(डॉ.प्रमोद पाब्रेकर फिरता चषक)

सर्वसाधारण उपविजेता संघ तृतीय (विभागून) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (स्व मुकुंद सरवदे फिरता चषक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page