अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शरीरयष्टी (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती : श्री संकराचार्य युनिव्हर्सिटी ऑफ संस्कृत कलडी, केरळ येथे 07 ते 09 मार्च, 2025 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शरीरयष्टी (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून चमूचा प्रशिक्षण वर्ग विद्यापीठाच्या क्रीडा संकुलामध्ये दि 27 फेब्राुवारी ते 03 मार्च, 2025 दरम्यान होणार आहे.

चमूमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा निखिल उके व वैभव बुंदेले, आर ए महाविद्यालय, वाशीमचा सोहेल खान, श्रीमती नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय, यवतमाळचा श्रीकांत लोणबैळे, नथमल गोयंका विधी महाविद्यालय, अकोलाचा कृष्णा बागेरे, एस आर महाविद्यालय, वणोजाचा पंकज मुराई, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोटचा मोहम्मद मुद्दसीर, केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा बॉबी साहू आणि व्ही एन महाविद्यालय, मंगरुळपीरचा अजय रावपलाई यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क साधता येईल.