उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव पुरस्कार जाहीर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने दिले जाणारे विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.
रासेयो एकक उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जळगाव जिल्ह्यातून बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. धुळे जिल्ह्यासाठी दोंडाईचा येथील स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल कला व विज्ञान महाविद्यालय आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी बामखेडा ता शहादा येथील ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालयाला जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात डॉ अनिल बारी(कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड), धुळे जिल्हा- डॉ कैलास चौधरी (दादासाहेब रावल कला व विज्ञान महाविद्यालय, दोंडाईचा) नंदुरबार जिल्हा- डॉ छबीलदास करंके (ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय, बामखेडा) रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून जळगाव जिल्ह्यासाठी जयेश साळुंके (समाजकार्य विभाग, सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कबचौउमवि), धुळे – वृंदावना पाटील (डॉ पी आर घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), नंदुरबार – राम ठाकरे (जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार).
संबंधितांना विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी दिली.