राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर : राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय व सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन साईनाथ पाटील जाधव साहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ राजेश यादव (प्राचार्य, ज्ञानज्योती कॉलेज ऑफ एज्युकेशन सोयगाव) हे होते. प्रमुख पाहुणे प्रा डॉ राजेश यादव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले.

Advertisement

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष साहेबांचे स्वागत प्राचार्य डॉ घुगे सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. राजेश यादव सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठीय उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास याविषयी विद्यार्थ्यांना अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ठाकूर मॅडम यांनी केले. तर आभार प्रशासकीय अधिकारी गोमलाडु सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांने झाली.

यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थिती होते व कार्यक्रम यशस्वी होण्यास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page