श्री बंकटस्वामी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा.

आपण आपल्या विद्यापीठाचा व आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वांनी कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे आज भारतातील नामांकित विद्यापीठामध्ये आपल्या विद्यापीठाचा क्रमांक वरच्या स्थानावर आलेला आहे याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे याच दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांसमोर आदर्श प्राध्यापक म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Advertisement

याच कार्यक्रमाच्या औचित्य साधत महाविद्यालयांमध्ये विविध विभागासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले व त्यामध्ये सर्व शैक्षणिक सुविधा व प्राध्यापक कक्ष विभागानुसार करण्यात आले. या सर्व विभागाच्या कक्षाचे उद्घाटन प्राचार्य डॉ विवेक मिरगणे व उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा ब्रम्हनाथ मेंगडे कार्यालयीन अधीक्षक शिवाजी भारती, कल्याण सावंत सर्व प्राध्यापक विभाग प्रमुख तसेच प्रशासकीय कर्मचारी याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page