मिल्लीया महाविद्यालयाची हर घर तिरंगा रॅली संपन्न

बीड : मिल्लीया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात “आजा़दी का अमृत महोत्सव अंतर्गत” हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट 2024 सोमवार रोजी ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली. हर घर तिरंगा या शासकीय उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅली ची सुरुवात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगितली तसेच येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यानिमित्ताने सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आव्हान केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ शेख रफीक यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवताना व उतरवताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली.

सदरील रॅली महाविद्यालयातून, किल्ला मैदान, कागजी दरवाजा, बलभीम चौक, खंदक रोड मार्गे काढण्यात आली. या रॅली मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थिनी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ उपप्राचार्य डॉ हुसैनी एस एस, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ शेख रफीक, डॉ शेख एजाज परवीन व सर्व प्राध्यापक – कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.

रॅलीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com