डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९४ वी जयंती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार, दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी आद्यशिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजण, हारार्पण, दीपप्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत लुंगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ पी आर टेकाडे, डॉ एस एस दासगुप्ता, डॉ राजीव गणेरीवार, डॉ आशिष डगवार, डॉ एस सी मोहोड, डॉ व्ही आर निस्ताने, डॉ पी ए मेश्राम, डॉ आर एस देशमुख, डॉ ए व्ही दारोकर, डॉ ए व्ही साबू, डॉ जी यू यादगिरे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.