‘स्वारातीम’ विद्यापीठातील कर्मचारी मारोती वाघमारे यांना श्रद्धांजली

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दूरध्वनी चालक अंध कर्मचारी मारोती दत्तात्रेय वाघमारे यांचे दि. २२ मार्च रोजी -हदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. कार्यालयीन काम करत असतांना त्यांना खुर्चीवरच -हदय विकाराच्या झटका आला होता. ही बाब सोबतच्या कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्यांना गुरुगोबिंदसिंगजी शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. दि. २३ मार्च रोजी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tribute to Maroti Waghmare, Staff of 'srtmu' University

मारोती वाघमारे यांनी विद्यापीठामध्ये २५ वर्ष सेवा केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मारोती वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page