‘स्वारातीम’ विद्यापीठातील कर्मचारी गणेश बारसे यांना श्रद्धांजली

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कनिष्ठ लिपिक कर्मचारी गणेश लक्ष्मणराव बारसे यांचे दि ११ मे रोजी स. ९:०० वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. दि ११ मे रोजी सांयकाळी ४:०० वा विष्णुपुरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे.

दि १३ मे रोजी गणेश बारसे यांना विद्यापीठामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, सहा कुलसचिव रामदास पेदेवाड, विद्युत उपअभियंता अरुण धाकडे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com