किनवट येथील संशोधन केंद्रातील अभ्यासक्रमाचा आदिवासी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा  – कुलगुरू डॉ. उध्दव भोसले 

नांदेड : आदिवासी बहूल किनवट व माहूर या तालुक्यातील आदिवासी, भटके, बंजारा व इतर समुदायातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील अडचन लक्षात घेऊन किनवट येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्राची उभारणी केली आहे. या भागातील आदिवासी, बंजारा आणि इतर समुदायातील पदवीधर विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेवून स्वतःचा‌, कुटुंबाचा आणि आपल्या तालुक्याचा विकास करावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांनी केले आहे. 

Advertisement

संशोधन केंद्राचा मुख्य हेतू या भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण पुरविणे, या भागातील संस्कृती, संसाधने, गरजा, विकास आणि समस्या यासंदर्भात संशोधन करणे, त्याचबरोबर शिक्षण आणि संशोधन यांचा विस्तार करणे हा आहे. ही ध्येय पुर्ण करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाने‌ संशोधन‌ केंद्रात नविन‌ शैक्षणिक धोरण २०२० नुसार २०२३-२४ या वर्षी Master of Social Work (MSW) दोन वर्ष कालावधीचा व्यावसायिक समाजकार्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. संशोधन केंद्रात प्रवेश‌ देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या Master of Social Work (MSW) अभ्यासक्रमास प्रवेश‌ घेण्याकरीता विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किनवट येथील कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रास संपर्क साधावा.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page